खडक माळेगाव : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्या बाबत शेतकऱ्यांचे निवेदन
खडक माळेगाव, २५ मार्च: खडक माळेगाव येथील शेतकऱ्यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
शेतकऱ्यांच्या मते, गेल्या ४-५ वर्षांपासून वीजपुरवठ्यात सातत्याने अडथळे येत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर केले होते, त्यामध्ये –
1. ५ MV क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवणे
2. गावठाण फिडर स्वतंत्र करणे
3. AG फिडर स्वतंत्र करणे
हे प्रकल्प मंजूर होऊन ६ ते ७ महिने उलटले असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीसह दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला ८-१० दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास डीपी किंवा गावातील टॉवरवर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात संबंधित विभागीय अभियंता आणि पोलीस प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी खडक माळेगावचे सरपंच जगदीश पवार, मा. उपसरपंच विकास रायते, कैलास रायते, तानाजी शिंदे, विठ्ठल कान्हे, सागर रायते, सोमनाथ रायते, किरण शिंदे, रविंद्र शिंदे, अनिल शिंदे, वाल्मीक रायते, विक्रम रायते, बाळासाहेब रायते, विलास चव्हाण तसेच खडक माळेगाव व खानगाव परीसरातील त्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– ग्रामप्रतिनिधी, खडक माळेगाव